
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
अभिनंदन हिमा दास! 💐💐
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जलद धावपटू बनलेली भारत देशाची शान ‘हिमा दास’ ला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. #HimaDas
💐💐💐💐🎉🎉शुभेच्छुक🎉🎉💐💐💐💐


🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
अभिनंदन हिमा दास! 💐💐
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जलद धावपटू बनलेली भारत देशाची शान ‘हिमा दास’ ला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. #HimaDas
💐💐💐💐🎉🎉शुभेच्छुक🎉🎉💐💐💐💐
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
खाकीतील कलाकार PSI पल्लवी जाधव यांचा अटकेपार झेंडा
जालना शहरातील दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव (मॅडम) नुकत्याच जयपूर येथील झालेल्या ग्लमोन मिस इंडिया स्पर्धेत 1st runner up विजेत्या झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..
🌹🌹🌿🌿💐💐
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
सेवा नरहरींची….🚩
सर्व बंधु भगिणीं यांसी सप्रेम
जय श्री नरहरी..
माघ वद्य तृतिया दिनांक १ मार्च २०२१ रोजी आपले अराध्य संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची पुण्यतिथी (सायुज्य सोहळा)..
मागील वर्षीच्या राज्यस्तरीय प्रश्न मंजुशा स्पर्धेला आपण दिलेला भरभरून प्रतिसाद पाहता, सेवा नरहरींची या उपक्रमाअंतर्गत,या ही वर्षी महाराजांच्या पुण्यतिथी निमीत्त नरहरी सोनार राज्यस्तरीय (ऑनलाईन) प्रश्नमंजुषा स्पर्धा हा उपक्रम आयोजित केला असुन,या स्पर्धेत राज्यातून अनेक रोख पारितोषिके व प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाण पत्र देण्यात येतील..
🏆 प्रथम पारितोषिक :–२१०१/- रोख.
श्री संतोष दत्तात्रय डहाळे परभणी.
वै.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दुसाने जालना यांच्या स्मरणार्थ.
🏆 द्वितीय पारितोषिक ११०१/-रोख.
———————-
🏆 तृतिय पारितोषिक १००१/-रोख.
श्री.प्रदिप सुरेशराव सोनार जळगाव.
श्री.सागर दहिवाळ परभणी.
🏆 उत्तेजनार्थ पारितोषिक ५०१/-रोख.
श्री.केशव कुलथे पुणे.
🏆 उत्तेजनार्थ पारितोषिक ५०१/-रोख.
श्री.महादेव बेद्रे शेवगाव.
🏆 शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रथम पारितोषिक १००१/-रोख.
श्री प्रशांतराव कुलथे जालना.
🏆 शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष द्वितीय पारितोषिक ७०१/-रोख
स्व. संभाजी व्यंकटराव मैड नांदेड यांच्या स्मरणार्थ.
सदरील स्पर्धेचा निकाल टाॅप ५० मधुन लक्की ड्रॉ पद्धतीने आपणा समोर *FB LIVE* द्वारे काढण्यात येतील.
टिप :- सदरिल स्पर्धा ही संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचा प्रसार व प्रचार व्हावा या साठी असुन .. त्यांच्या बद्द्लचा इतिहास सर्वाना कळावा हा हेतु आहे.या करीता जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावे हि विनंती.
वेळ दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत.
आपणास सोनार समाजाच्या सर्व ग्रुपमध्ये online स्पर्धेची लिंक पाठवण्यात येईल.
===================
क्रृपया हा संदेश आपल्या कडील सर्व ग्रुपमध्ये शेयर करावा हि विनंती. 👏
पारितोषिक संयोजकात नाव नोंदणी साठी संपर्क….. 👇
9890091411,7276999000, 9049805285,8668752138, 9822971946,8275676713,
रावेरचेभुमी पुत्र ,मित्रांचे भाऊ साहेब सुनील कुमार लोखंडे (अ.कमिशनर सेंट्रल एक्साईज आणि कॅस्टम अधिकारी, अहमदाबाद)यांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
प्रशांत बोरकर
तरुण तडफदार टीम रावेर
🔸तरुण तडफदार न्यूज🔸
परमात्मा कुठे आहे?
– संत राजिदर सिंह जी महाराज
लोकांद्वारे विचारल्या जाणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की, परमात्मा कोठे आहे? आपण आपल्या आत्म्याविषयी सुद्धा जाणू इच्छितो. विज्ञानाने आज खूप प्रगती केली आहे, जिथे आपल्याकडे बाह्य अंतरिक्षा विषयी माहिती उपलब्ध करण्यासाठी शक्तिशाली दुर्बीण आणि अवकाश याने आहेत. तसेच प्रत्येक परमाणुतील छोट्या कणाला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्रे आहेत, तरीही विज्ञान याबाबत खुलासा करू शकत नाही की, ईश्वर या भौतिक ब्रम्हांडा मध्ये कोठे आहे? सत्य स्थिती अशी आहे की सृष्टिकर्ता आज पर्यंत बाह्य भौतिक मंडलांमध्ये भेटला नाही. संत महापुरुष शतकानुशतके सांगत आहेत की परमात्मा आपल्या अंतरी आहे. त्यांनी ध्यान-अभ्यासाद्वारे परमात्म्याला अंतरीच प्राप्त केले.
ध्यान-अभ्यास काय आहे? काही लोक केवळ शरीर आणि मस्तिष्क यांना आराम देण्याचे एक माध्यम मानतात. संत आणि महापुरुषांकरिता मात्र ध्यान अभ्यास परमात्म्याला अंतरी शोधण्याचा मार्ग आहे. ध्यान-अभ्यासाच्या माध्यमातून आपण या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो की मृत्यूनंतर आपले काय होते? आणि या भौतिक जीवनानंतर ही जीवन आहे का?
सर्व संतांनी मानवी शरीराला हरीमंदिर म्हटले आहे, ज्यामध्ये सृष्टिकर्ता राहतात. कारण आत्मा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये परमात्मा अस्तित्वात आहे. ध्यान-अभ्यास केल्याने आपण अंतरीच परमात्म्याला शोधू शकतो.
ध्यान-अभ्यास करण्याकरिता काय निर्देश आहे? ध्यान-अभ्यास सहज, सोपी पद्धत आहे. आपण केवळ बसण्याकरिता एक शांत आणि आरामदायी जागा शोधूया, जिथे आपले मन आणि शरीर स्थिर होईल. आपण आपले डोळे बंद करून अंतरी पहावे काय दिसते? ध्यान-अभ्यासादरम्यान मन आपणास विचारां द्वारे विचलीत करते, याच करिता अध्यात्मिक विज्ञानामध्ये आपण परमात्म्याच्या कोणत्याही नामाचा मानसिक रूपाने जप करतो. कारण मनातील विचारांपासुन आपले ध्यान भटकता कामा नये. असे केल्याने आपण आराम व शांती अनुभवतो आणि आपल्या आत्म्यास अध्यात्मिक अनुभूती होईल जी आपणास ईश्वराच्या शोधार्थ घेऊन जाईल.
दररोज मानवी शरीराचा एका प्रयोगशाळेच्या रूपात उपयोग करून ध्यान-अभ्यासाची अध्यात्मिक साधना केल्याने आपणास कळेल की, ईश्वर कुठे आहे? जेव्हा वैज्ञानिक ईश्वराला बाह्य अंतरिक्ष किंवा परमाणुतील सूक्ष्म कणांमध्ये शोधत असतात तेंव्हा आपण ध्यान-अभ्यासास बसून सृष्टीतील सर्वात मोठ्या रहस्याला स्वतः उलगडू शकु.
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
जय नरहरी
अखेर आपणा सर्वांचे दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या पुतळ्याचे धुळे महा नगरपालिका आवारात आगमन झाले .
आपल्या सर्वांच्या सहकार्य मुळे हे शक्य झाले .
स्टॅच्यु ऑफ युनिटी च्या धर्ती वर साकार…
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
अनघा ठोंबरे यांचं पुण्याला आपल्या राहत्या घरीच एक अनोखं ‘दुकान’ आहे, गेली पंधरा वर्षे सुरू असलेलं. हे दुकान आहे कॅशलेस. कारण तिथल्या वस्तू फुकट दिल्या जातात. दिवाळीला कपडे, नवरात्रीत नऊ साडय़ा, ईदसाठी ओढण्या, वारीसाठी टोप्या, अनवाणी लोकांना चप्पल, भुकेल्यांना अन्न, लहान मुलांना खेळणी, कष्टकरी बाईला तवा, कुकर, इतकंच नाही तर ‘स्थळ दाखवायला’ नवीन कपडेही.. सारं काही इथे मिळतं.. समाजातल्या गरीब बांधवांसाठी सुरू असलेल्या या अनोख्या ‘दुकाना’साठी हजारो लोकांची मदत झाली.. होते आहे.. ‘पिंपळाला पार बांधण्यासाठी’ असंख्य हात पुढे येत आहेत..
यशाच्या एका क्षणी माझ्या आईने मला सांगितलं, ‘‘आपलं आयुष्य, आरोग्य, यश, समृद्धी, शिक्षण यांच्यामागे कितीतरी राबणारे, कष्ट करणारे हात असतात, मग ते हात शेतात राबणारा शेतकरी,ओझी उचलणारा हमाल, सफाई कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, मोलकरणी, सीमेचे रक्षण करणारा जवान असे अगणित असतात. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे, ते सगळे यशाचे, श्रेयाचे वाटेकरी आहेत. आपण सण, उत्सव साजरे करतो, छंद, मनोरंजनाने आनंदी होतो, नोकरी करतो, वृद्ध रुग्णांची सेवा करतो, घर सजवतो, प्रत्येक वेळी त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पिंपळाला पार बांधत राहावं.’’ माझ्या आईच्या शब्दाला ‘अमर’ करण्यासाठी एका क्षणी मी भरपूर पगार, सुविधा असणारी केंद्र सरकारची सन्मानाची नोकरी सोडली आणि गरिबांसाठी ‘समाजप्रस्थाश्रम’ स्वीकारला. घेणाऱ्यांचे हात हजारो आहेत हे माहीत होतंच, पण देणाऱ्यांचेही हात हजारो आहेत, याचा साक्षात्कार झाला, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या देण्या-घेण्यातून असंख्य आठवणी माझ्या पदरात पडत गेल्या.. समाधानाचं कटोरं शिगोशिग भरत गेलं.. आजही जातंय..
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला फक्त फिल्मी गरिबी माहिती होती, खरी गरिबी कधी अनुभवली नव्हती वा त्यांच्या जगण्याशी माझा थेट सामना कधीच झाला नव्हता. पण आजूबाजूला गरिबी होती. लांब अंतरावर असली तरी दिसत होती. झोपडपट्टीतलं जगण्याची मी कल्पना करू शकत होते. उपाशी असणं, जे हवं ते न मिळणं यातली कुचंबणा मला जाणवत होती. आणि गरिबीसाठी माझ्या दृष्टीने कारणीभूत होता, शिक्षणाचा अभाव. मग त्यांच्यासाठी काही करायचं तर सुरुवात त्यांच्या शिक्षणापासून करायचं ठरवलं, गरीब वस्तीतल्या लोकांना साक्षर करायचं ठरवलं. पण मला लवकरच उमजलं शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडूनच शिकण्यासारखं खूप आहे. त्यांचं स्वत:चं एक तत्त्वज्ञान आहे, एक संस्कृती आहे आणि ते त्यांना जगण्याचा अर्थ देत आहेत. जे आहे ते स्वीकारण्याची, गोड मानून घेण्याची त्यांच्यात एक उपजत समज आहे, हे लक्षात येत गेलं, सणावाराला नवी साडी नेसून, बेंटेक्सचे दागिने घालून, डोक्यात गजरा माळून दहा घरची भांडी घासणारी बाई, तिची हौस, डोळ्यातला आनंद, उत्साह, रोज जीवनमरणाचा, दोन वेळच्या जेवणाचा संघर्ष असूनही तिला असणारी जीवनाची ओढ पाहून सकारात्मक जगण्याचा अर्थ मीच त्यांच्याकडून शिकले, जगण्याच्या विद्यापीठात! त्या माझ्या कितीतरी पुढे होत्या, त्यांनी माझी दु:खं छोटी केली, माझं मन मोठं केलं. मी त्यांची श्रोता झाले, एवढय़ा छोटय़ा गोष्टीनेही त्यांनी मला खूप प्रेम दिलं, निरपेक्षपणे. मग त्यांच्यासाठी मी ‘आस’ हे महिला मंडळ स्थापन केले.त्यांच्या अपेक्षा अगदी छोटय़ा होत्या, पण त्यांची हौस खूप मोठी होती.. आणि ती पूर्ण करण्याची संधी मला लवकरच मिळाली.
एका गरीब मुलीची ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करायची होती. ती गुणी मुलगी कविता करत असे, या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध करायची तिची शेवटची इच्छा होती. उपचार, तपासण्यांसाठीही पैसे नव्हते, तिच्याविषयी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आणि मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी भरभरून मदत केली, सर्व तपासण्या, उपचार, शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळाले. मुख्य म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर ती वाचली, ती आता दोन मुलांची आई आहे. मग तिच्या वस्तीतल्या अनेक गरीब स्त्रिया आल्या. त्यांनाही मदत हवी होती. मग वृत्तपत्रे मासिकातून अनेक लेख प्रसिद्ध झाले, त्याच्याशिवाय सगळं अशक्यच होतं, त्यांचे उपकार विसरू शकत नाही, कधीच नाही. और कारवाँ बनता गया.. अशा पद्धतीने असंख्य लोक जोडले गेले. अनेक जण काही ना काही आणून देऊ लागले. चांगल्या अवस्थेतील वस्तू, तर काही वेळा न वापरल्या गेलेल्या वस्तू, अगदी भांडीसुद्धा. काही तर अगदी कोरी करकरीत. काहींनी त्यांचे संपर्क क्रमांक दिले. काहीही लागलं तरी फोन करा, असं आवर्जून सांगितलं. अशा तऱ्हेनं माझं गरिबांसाठीचं ‘कॅशलेस दुकान’ सुरू झालं. इथे सगळं काही मिळतं. एकही पैसा न घेता.
प्रथम कपडय़ांचं दुकान सुरू झालं. अनेक लोक जुने पण चांगल्या अवस्थेतले कपडे आणून देतात. मग ते गरिबांना, कष्टकऱ्यांना दिले जातात. एकदा एक माहिती समजली, नवीन जन्मलेल्या बाळांना झबली नसतात. एका रुग्णालयामध्ये ही दीडदोनशे बाळे उघडीच असतात, असं कळलं. अनेकांनी मला जे फोन नंबर दिले होते, त्यांच्याशी संपर्क साधला. मग ब्लाऊजपीस, कटपीसेस लोकांनी आणून दिली, एका मैत्रिणीने तीनशे झबली मोफत शिवून दिली, माझ्या दुकानात झबली आली. ज्यांना ती हवी होती त्या गरीब स्त्रिया माझ्या या दुकानात आल्या आणि आवडीची झबली घेऊन गेल्या. बाळांना झबली मिळाली, त्यांचे गोजिरवाणे चेहरे डोळ्यासमोर आले नि मी खूप श्रीमंत झाले. मी माझी राहिलेच नाही..
मग माझे कपडय़ांचे दुकान प्रसिद्ध होत गेले, इकडे देणाऱ्यांचे हातही हजारो झाले. एकाने रेडिमेड कपडय़ांचे दुकान बंद केले, मुलांचे चारशे ड्रेसेस मला फुकटात आणून दिले. ते सारे आदिवासी, ग्रामीण भागात पाठवले. आदिवासी भागातली मुले तर चार दिवस अंगावरचे कपडे धुण्यासाठी द्यायला देखील तयार नव्हती, नुसतं ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले. माझा प्रत्येक सण वेगळ्या अर्थाने आता साजरा होतो. रमजान ईदला मुलींना, बायकांना नमाज पढायला नव्या ओढण्या हव्या असतात. पण त्याचबरोबरीने त्यांना हवी असलेली खजूर, दुधाची पाकिटं तीसुद्धा या दुकानात मिळायला लागली. असंख्य अनामिक देणाऱ्यांची एक मोठीच्या मोठी यादीच आहे माझ्याकडे. एक फोन करायचा अवकाश माझ्या या दुकानात सगळं काही येऊन पडतं. अगदी भरभरून. मग मी गरजूंना मानाने बोलावते, कुणी बोहारणी, कुणी कासारणी, कुणी मोलकरणी, कुणी गावाकडच्या. सगळ्या जणी तृप्त होऊन जातात आणि मग माझ्यासाठी मशिदीत मन्नत मागितली जाते, माझ्यासाठी ‘रोजे’ धरले जातात. मोराचे पीस पायाला आणून बांधलेही जातात. अतीव प्रेमाने माझी ईद आनंदमय होते. पांडुरंगाच्या वारीच्या वेळी टोप्या, पायजमे, शर्ट, धोतर हवे असतात अनेकांना. दोन-तीन महिने आधीपासून मी ते जमवायला सुरुवात करते. मग साबण, टूथपेस्ट, पाण्याच्या बाटल्याही जमवते सगळ्यांना वाटायला. आजपर्यंत कधी काही कमी पडले नाही की अपुरे पडले नाही. मी वारीला न जाताही प्रसाद आणून दिला जातो, प्रत्येकात विठुराया दिसतो. घरबसल्या पुण्य कमवते. नवरात्रातल्या नऊ दिवसांत उपवासाला दाणे, साबुदाणे, राजगिरा वडय़ा आणून दिल्या जातात आणि मागितल्याही जातात. सगळ्या सणांना काही ना काही दिलं- घेतलं जातंच. सगळे देव माझ्यावर प्रसन्न आहेत. इतकंच कशाला अनेकांच्या लग्नपत्रिकेवर माझं नाव असतं. कुणी पाया पडायला येतात, कुणी कानावर बोटे मोडतात, कुणी मलाच खाऊ आणून देतात. खूप काही घडत असतं या देण्या-घेण्यात!
इतकंच कशाला एखाद्या गरीब मुलीचा ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम असतो. कधी तर तो माझ्या घरातच होतो, मी चहा बिस्किटे आणते, तिला चांगला ड्रेस लागतो, तो मी आधीच मिळवलेला असतोच. तो मग अशा मुलींच्या अंगावर चढतो. लाजणारी ती मुलगी जेव्हा लग्नाच्या बोहल्यावर चढते तेव्हा मी भरून पावते. माझ्याकडे येणाऱ्या मुलींमध्ये अंध मुलीही आहेत. त्यांना अंगभर कपडा लागतो, त्यांच्यासाठी पूर्ण बाह्य़ांचे ड्रेस लोक मला आणून देतात. गरीब शेतकऱ्यांना शहरात उपचाराला, कुणाला भेटायला यायचे तर धड कपडे नसतात अंगावर, काही जण मग शेजाऱ्यांचे बिनमापाचे कपडे घालून येतात. कुणी असे लोक दिसले की माझ्या दुकानातले कपडे त्या खेडय़ापाडय़ात जातात. महालक्ष्मीला नेसवायला साडय़ा, घराला दार नसते, मग लावायला पडदे, असा पडद्यांचा स्टॉकही माझ्या दुकानात असतो. पावसात पॉलिएस्टर साडय़ा लागतात, थंडीत स्वेटर्स, बाळांना गुंडाळायला सुती साडय़ा लागतात. पेटिकोट्सची तर कायम डिमांड. अधिक महिन्यात गरीब स्त्रियांना पेटिकोट्स वाटते. माझ्या दुकानात सर्व व्हरायटीज मिळतात. साठ सत्तर आज्या आहेत, त्या नऊवारीच नेसतात. आता नऊवारी जुने मिळतच नाही मग नवीन नऊवारी साडय़ा माझ्या दुकानात दिवाळीत येऊन पडतात. मोठे दुकानदारही भरपूर डिस्काऊंट देतात. रिक्षावाले ओझी उचलायला मदत करतात. ‘आमचाही हात लागू दे’ म्हणतात. माझे ‘दुकान’ सजते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेकींना नऊ रंगांच्या साडय़ा हव्या असतात. मग माझे फोन अनेकींना जातात. नातेवाईक, मैत्रिणी, मंडळे, कट्टे, सोसायटय़ा.. त्यांच्याकडून भरपूर साडय़ा येतात. माझाही खारीचा वाटा असतो. संक्रांतीला काळी साडी पाहिजेच असते. मग त्या जमा करायच्या. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला पांढरी साडी हवी असते, दिवाळीत जरीच्या साडय़ा पाहिजेत, असा चक्क आग्रह असतो. मग दिवाळीआधीच त्या माझ्याकडे न्यायला येतात आणि दिवाळीत मॅचिंग ब्लाऊज शिवून छान नेसून येतात. एकीला गोंडय़ाच्या साडय़ांची हौस, मला हळूच कानात सांगून गेलेली असते. मग ती साडी दिसली की मलाच खूप आनंद होतो. तिला देते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक मला तृप्त करते. एकदा एका गावी एक टेम्पो भरून कपडे पाठवले, त्यात काही नवेही कपडे होते. ते लोक कपडे घालून नाचले, अक्षरश: रडले. अत्यानंदाने तो दिवस त्यांनी सणासारखा साजरा केला. मला फोन येत होते, तो दिवस माझ्यासाठी दिवाळी दसराच होता. त्यांचा आनंद मला ‘जीनेका बहाना’ देतो.
कपडय़ांबरोबर सर्वाधिक मागणी असते ती वस्तूंना, भांडय़ांना. या लोकांना मी त्यांना देणारच हे इतकं पक्कं माहीत असतं की चक्क हक्काने मागूनच घेतात. ‘आम्ही कधी कान असलेल्या कपातून चहा प्यायलो नाही. आम्हाला कपबशा द्या,’ मागणी येते. मग मी माझ्या ओळखीतल्यांना फोन करते. ते लोक स्वत:साठी नवे कप आणतात आणि जुने माझ्या गरिबांसाठी देतात. अशा देण्यातून मला हजारो लेकी मिळाल्या आहेत. चकलीसाठी कुणाला सोऱ्या हवा असतो, कुणाचा कुकर नवरा दारू पिण्यासाठी विकतो, तिला कुकर, एकदा रस्त्यावर तीन दगडांची चूल मांडणारीने मला तवा मागितला, भाकरी नाही मागितली, हे मला विशेष वाटलं. मग लोकांकडून मला जुनी भांडी मिळू लागली, जुनी कसली नवीनच. दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याचे कॅन्स, भांडी लागतात, मग लोकांनी बादल्या, कळशा आणून दिल्या. गेल्या पंधरा वर्षांत काय हवे तेही समजले. मला आणि देणाऱ्यांनाही! सगळं आपसूक माझ्या या दुकानात येऊन पडतं किंवा पैसे येतात त्यातून विकत घेतलं जातं.
देणाऱ्यांना फक्त निमित्त लागतं. कुणी मग स्वत:चे, मुलाचे वाढदिवस, कुणाचे स्मृतिदिन तर कुणी दिवाळी, दसरा, नवरात्र या सणाच्या निमित्ताने अनेक वस्तू आणून देतात अगदी नवीन. माझी ही मुलं गोटय़ा, दगडांनी खेळतात.. मला वाटतं त्यांनाही मिळावी खेळणी. मग काय मनात यायचा अवकाश खूप खेळणी आणून देतात लोक! मी त्यांचं छोटं प्रदर्शन भरवते. या सगळ्या मुलांना बोलावते. ज्याला जे हवे ते खेळणे निवडायचे. तो बालआनंद मला माझ्या बालपणात नेतो. मी छोटी मुलगी होते, बाहुलीचे लाड करते.. खऱ्या आणि खेळण्यातल्याही.
उन्हात पाय भाजतात, चटके खात खात लोक माझ्याकडे येतात. चप्पल, बूट मागायला. माझ्या या दुकानात ते असतातच. मग आपल्या मापाचे, आवडीचे चप्पल, बूट घेऊन जातात. एकदा एका गरीब, गुणी मुलीने कळवलं, तिला शिवण मशीन पाहिजे होते. ती त्याचा नक्कीच चरितार्थासाठी उपयोग करणार याची मला खात्री होती. सहज म्हणून, पाहू या तर खरं म्हणून फोन केले तर एकाने एक छान मशीन नवी मोटर बसवून आणून दिली. मोठी माणसं तर मदत करतातच पण त्यांचं पाहून लहान मुलंही त्यांच्या या मित्रांसाठी मदतीचा हात पुढे करतात. काही शाळांचे विद्यार्थी मदत करतात. ‘मोती साबण, पेन्स, टूथपेस्ट, खेळणी, हौसेने आणतात. एका रोजगार हमीवर काम करून इंजिनीअरिंग करणाऱ्या तरुणाला कॉम्प्युटर हवा होता. तोही प्रिंटरसकट एकाने आणून दिला. सायकल हव्या होत्या तर मोठय़ा सोसायटीतल्या पार्किंगमधल्या वीस सायकली दुरुस्त करून आणून दिल्या. गरजेच्या वस्तू दिल्या घेतल्या जातातच पण गंमत म्हणजे हौसेच्या वस्तू पर्सेस, पावडरचे डबे, बेडशीट्स, तोरणे हेही सगळं मिळत राहतं.
माझ्या या दुकानात धान्य बँकही आहे, काही भुकेल्या घरांसाठी! डाळ, तांदूळ, चहा, साखर, कडधान्येही लोक आणून देतात, बिस्किटांचे पुडे, कांदा लसूण मसाला, अगदी दूध पावडरही! दुष्काळी भागातले लोक येतात, त्यांना देवाच्या नैवेद्याला डाळ, गूळ, कणीक हवी असते, बाळंतिणीला दलिया, वरणभात हवा असतो. तो तिला इथेच मिळतो. मुख्य म्हणजे काही तरी द्यायचं हा भाव नाही. चांगल्या गुणवत्तेच्या, खाण्यासाठी योग्य वस्तू या लोकांकडून मिळत जातात. या सगळ्याचा उपयोग आजूबाजूच्या लोकांमध्येही होतो. केवढे माझे भाग्य. गंभीर शस्त्रक्रियाही डॉक्टर मोफत करतात. उपचार करतात. त्यांच्या औषधांचे पैसेही मिळत राहतात.
आता तर मला फार करावं लागतच नाही. लोकांनी आपणहून गट तयार केले आहेत. तरुण मुले आहेत, आय.टी. इंजिनीअर्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरिबांना मदत करणारे गरीबही आहेतच. असे मानवतेचे दुकान. मला मिळालाय आनंदाचा ठेवा. मोक्ष कशाला? मी पुनर्जन्म मागते आहे.. मला आणखी आनंद हवा आहे! तुम्हीही त्यात सहभागी व्हाल?
अनघा ठोंबरे
1/13 सहजानंद सोसायटी,कोथरुड
पुणे-34
फोन 020-25382633
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
विश्व योगी स्वामी मच्छिंद्रनाथ महाराज मंदिर मिटमिटा औरंगाबाद येथे प. पू डॉ श्री मंगलनाथ महाराज यांचा सत्कार करताना रावेर शिक्षण संवर्धक संघातील अध्यक्ष कन्हैयालाल शेठअग्रवाल,उपाध्यक्ष अशोक शेठ वाणी, सचिव प्रमोद वाणी व सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ शितल वाणी, संतोषशेठ अग्रवाल, सुधीर पाटील ,शैलेंद्र देशमुख व सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कार्यवाहीचे
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आदेश
जळगाव, दि. 22 (जिमाका) :- कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश आज जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे वाय के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए. के पाठक, महानगर पालिकेच्या अप्पर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते.
श्री राऊत म्हणाले की बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी तसेच परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी. एस. टी. महामंडळाच्या तसेच खाजगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवाशी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, रेल्वे विभागाने अमरावती, अकोला, मुंबई, पुणे व नागपूर या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच रेल्वे गाडीतून प्रवास करतांना सोशल डिस्टन्सींग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी करुन प्रवासी प्रवास करीत आहे हे तपासावे, अन्न व औषध विभागाने गर्दी होणाऱ्या उपहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी. ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सींग पाळावे. यावेळी जळगाव महापालीकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अप्पर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली.यात 377 विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, 14 मंगल कार्यालये, 15 खाजगी क्लासेसवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्य विषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.
००००
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी- पालकमंत्री
शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी; जिल्हाधिकार्यांची घोषणा
जळगाव (जिमाका) दि. २२ :- जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. तर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली असून याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आज जारी केले आहेत.
जळगाव जिल्ह्यात मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आली होती. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोना रूग्णांची संख्या सतत वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शनिवारीच दिले होते. यानंतर शनिवारी सायंकाळी आणि रविवारी रूग्णसंख्येत वाढ झाली.
या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी चर्चा करून कडक कारवाईचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अर्थात या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास त्याच्यावर नियमानुसार कडक कारवाई होणार आहे.
दरम्यान, गरज पडल्यास शाळा बंद करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी आधीच दिले होते. यानुसार जिल्ह्याधिकार्यांनी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व क्लासेस बंद करण्याचे आदेश देखील जारी केले आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी निकराचे प्रयत्न केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी होऊन संसर्ग देखील कमी झाला होता. यानंतर आता देखील त्यांनी संयुक्त रितीने प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चाप
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून दोन दिवसांपासून धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्यांना चाप बसला असून प्रशासनातील सर्व घटकांचे मनोधैर्य उंचावले आहे. यामुळे कालपेक्षा आज जिल्हाभरातील कार्यक्रमांमध्ये नियमांचे पालन होत असल्याचे चित्र दिसून आले. जिल्हाधिकारी अॅक्शन मोडमध्ये आल्यामुळे हे शक्य झाल्याचे दिसून आले आहे. या पाठोपाठ आता कठोर प्रशासकीय उपाययोजना जाहीर केल्यामुळे कोरोनाच्या आपत्तीला आळा बसू शकतो.
जिल्हाधिकार्यांनी खालीलप्रमाणे निर्देश जारी केले आहेत.
१) सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरीता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित रहावे.
२) अभ्यासिका ( लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५०% क्षमतेच्या मर्यादेत सुरु ठेवता येतील.
३) सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, दिंडी व तत्सम धार्मिक कार्यक्रम यांना बंदी राहील.
४) सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ १० लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील.
५) सर्व प्रकारचे सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
६) सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक व तत्सम कार्यक्रम यांना बंदी राहील. तसेच सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने यांना बंदी राहील.
७) जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत.
8) कायद्याव्दारे बंधनकारक असणार्या वैधानिक सभांना केवळ ५० लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील. तथापि याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचीत करणे आवश्यक राहील. मात्र जिल्हा परिषद सर्व साधारण सभा व जळगांव शहर महानगरपालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सुट राहणार आहे.
९) लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करतांना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभिर्याने दक्षता घ्यावी.
१०) सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचार्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबींचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोविड-१९ ची लक्षणे दिसून येणार्या संशयित कर्मचार्यांची कोविड-१९ चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.
११) संपूर्ण जळगांव जिल्हयात रात्री १०.०० वाजेपासून सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) घोषित करण्यात येत आहे. मात्र या संचारबंदी दरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार ( तथापि संबंधित कामगारांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील); बाहेर गावाहून येणार्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहील. मात्र ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येईल. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक व संबंधित आस्थापना उदा. पेट्रोलपंप, गॅरेजेस यांना देखील सूट राहील.
१२) गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी राहील. मात्र केवळ ५ लोकांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येईल.
सदरचा आदेश हा सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी पारीत करण्यात येत आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत.
00000
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
दि 21 /2/ 2021
*मुख्यमंत्र्यांनी दिली आठ दिवसांची मुदत*
*मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा*
——
*संसर्ग रोखण्यासाठी आता ” मी जबाबदार” मोहीम राज्यभर*
——-
*वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना संबोधन*
मुंबई दि २१: मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते.
संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत.
*पुढील ८ दिवसांत जनतेने निर्णय घ्यावा*
कोविड परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील ८ दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले.
*आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका*
गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय , त्यात आपल्याला यशही आले . मुंबईत आपण दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून ८०० ते ९०० रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढताहेत, आज दिवसभरात सुमारे ७ हजार रुग्ण आढळले ही चिंताजनक बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेडसे, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या. पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळॆ खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत, लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत हे बरोबर नाही.
सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले.
*कोविड पसरविणारे कोविड दूत बनू नका*
पाश्चिमात्य देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्याठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत. सध्या कोविड योध्द्यांचे सत्कार सुरु आहेत. या योध्यांनी जीवावर उदार होऊन लढाई केली आहे, मात्र त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण कोविड पसरविणारे कोविड दूत बनू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
*” मी जबाबदार” ही मोहीम*
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखले सुद्धा पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही आपली व्यक्तिगत जबाबदारी असून ती सर्वानी पार पाडण्यासाठी ” मी जबाबदार” ही मोहीम सुरु करीत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
*महाराष्ट्र थांबला नाही*
कोविडची जोरदार साथ असताना देखील महाराष्ट्र थांबला नाही. २ लाख कोटींपर्यंत गुंतवणूक महाराष्ट्राने आणली. एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांना सुरुवात झाली, पर्यटन असो किंवा कृषी क्षेत्र असो आपण विकासाची कामे सुरूच ठेवली. भूमिपूजने झाली, कृषी पंपांना वीज दिली, मी विदर्भात, मराठवाड्यात येऊन गेलो , जव्हारला भेट दिली. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग १ मे पासून नागपूर-शिर्डी वाहतुकीस सुरु करतो आहोत. कामे थांबणार नाही मात्र आता गर्दी करून याचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत तर ती ऑनलाईनच करण्याचे म्हणजे संसर्गाला आमंत्रण मिळणार नाही यादृष्टीने मी सूचना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधानांसमवेत नीती आयोगाच्या बैठकीत आपण कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत धोरण असावे अशी मागणी केली असून याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आज केला.
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
हिच खरी शिवजयंती आज साजरी केली
औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली रस्त्यावरील भिकार्रांचा केला कायाकल्प केला
सुलक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम राबवला .
आज शिवजयंती निमित्त औरंगाबाद संभाजी नगर येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप तर्फे आज औरंगाबाद शहरात एक आगळावेगळा उपक्रम व एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.प्रथम क्रांती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करुन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. गरीब निराधार बेवारस अशा मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजूनही जिवंत आहे हे तरुणांचे प्रेरणास्थान समाजसेवक सुमित पंडित यांनी आज दाखवुन दिले.आज दिनांक 19 रोजी शिवजयंती च्या पर्वावर भिकार्यांना ही जंटलमँन बनवण्याचा ध्यास मनी घेऊन हा उपक्रम कौतुक करण्यासारखा आहे. दरवर्षी शिवजयंती च्या दिनी वेगवेगळ्या ठिकाणी ही सुलक्ष्मी बहुद्देशियय सेवाभावी संस्था हे कार्य करत आहे.आज सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसर या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून त्यांना माणूस बनवण्याचे कार्य सुमीतभाऊ करत आहे. सुमित भाऊ स्वतः गरीब निराधार नागरिकांना न्याय देण्यासाठी उपस्थित होते.त्यावेळी स.पोलिस.निरक्षक संजय बनसोडे विशाल टिंप्रवार भरतभाऊ कल्याणकार ज्यूनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने समाजसेविका पुजा पंडीत.त्यावेळी माणुसकी समुह जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी चेतन पाटील हे उपस्थित होते.व सहकार्य केले.
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
दि. १५ फेब्रुवारी २०२१
किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा, अपघातातील मृतांबाबत दुःख
मुंबई, दि. १५ : जळगाव जिल्ह्यातील किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱा टेम्पो पलटी होऊन त्यात १५ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळत आहे. मृतांमध्ये सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले.
000
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
आज मुंबई मंत्रालय येथे महा डिजिटल मीडिया असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विविध मंत्री व त्यांचे सचिव यांची भेट घेऊन डिजीटल मीडिया पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी जवळ जवळ सर्वच मंत्री व सचिव डिजीटल मीडिया बाबत सकारात्मक असून लवकरच डिजीटल मीडिया पत्रकारांना चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत.
#mdma @mdmaoffice #महाडिजीटलमीडियाअसोसिएशन
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर,शशांक बोरकर🔸
रावेर – येथील पाराचा गणपती मंदिर संस्थान तर्फे श्री गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . पंचक्रोशीतील भावीक भक्त महिला पुरुष यांनी दर्शनाचा लाभ घेतला .
यावेळी मोतीचूर लाडू चा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले .
भोकरी ता.रावेर -सिध्दीविनायक मानव कल्याण मिशन तर्फे श्री क्षेत्र ओंकारेश्वर येथे गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा…
रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले..तीन दिवसीय अथर्वशीर्ष पठणाचा समारोप श्री गणेश स्तुत्ती पारायणने झाला.. सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते…
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
ऐनपूर महाविद्यालयात पदवी नंतर पुढे काय? या विषयावर वेबिनार संपन्न
ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी नंतर पुढे काय? या विषयावर वेबिनारचे आयोजित करण्यात आले, सदर वेबिनार चे
अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी भूषविले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. शैलजा पाटील, संचालिका, मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, जळगाव यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना पदवी नंतर उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेस ची माहिती दिली. विद्यार्थ्यांशी हितगूज करतांना त्यांच्या विविध शंकाचे निरसन केले. प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी अध्यक्षीय समारोपात मुलभूत शिक्षण या सह आपण सध्या ज्या सेवेची गरज आहे ते कोर्सेस केले तर आपल्याला या स्पर्धेच्या जगात नोकरी सहज उपलब्ध होऊ शकते असे सांगितले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. सतिश वैष्णव तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप साळुंखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सतिश वैष्णव, डॉ. संदिप साळुंखे, डॉ. जे. पी. नेहेते, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. आर. व्ही. भोळे प्रा. पवन खंबायत यांनी परिश्रम घेतले.
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
नारीशक्ति महिला प्रभाग संघ, विवरा-वाघोदा गटांमधील जय श्रीकृष्ण महिला ग्राम संघ शिंदखेडा यांच्यामार्फत आज भारत मातेचे प्रतिमा पुजन करुन पुलवामा हल्लातील विर शहिद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.या प्रसंगी सर्व ग्राम संघातील महिला उपस्थित होते. ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील,CRP सौ.रुचिता महाजन बँक सखी जयश्री पाटील आशा वर्कर सौ.ज्योती पाटील,ग्रामपंचायत सदस्य सौ.जिजाबाई चौधरी, सौ.प्रतिभा पाटील,सौ.कोमल पाटील,तसेच ग्राम संघातील सर्व महिला उपस्थित होत्या.
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
खंडवा रावेर भुसावल अमलनेर पसेंजर लोकल ट्रेन शटल तथा रेल्वे होल्ट की विभिन्न रेल्वे मांग सकारात्मक प्रतिसाद,
रेल बोर्ड को मंजूर के लिए कार्यवाही हेतु प्रस्तुत
रावेर रेल्वे प्रवाशी मित्र ग्रुप की विभिन्न मांग पर भुसावल रेल अफसरो का सकारात्मक प्रतिसाद
रावेर रेल्वे प्रवासीमित्र ग्रुप एडमिन श्री प्रशांत बोरकर द्वारा कार्यवाही का स्वागत. जल्द मांग मंजूर होनेकी हजारों प्रवाशी वर्ग में ख़ुशी की लहर,,
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
श्री. राजे छत्रपती संस्थे तर्फे यंदाचा राज्यस्तरीय गोदागौरव पुरस्कार सामाजिक क्षेत्रात श्री. लालजी पाटील, नाशिक यांना जाहीर.
सदरहू पुरस्कार श्रीमंत युवराज छत्रपती संभाजी राजे, खासदार -राज्यसभा, मा. श्री. छगनरावजी भुजबळ, पालक मंत्री, नाशिक, मा .खासदार श्री. हेमंतजी गोडसे, नासिक, मा. महापौर श्री. सतीशजी कुलकर्णी, नाशिक, मा. रविंद्रजी मिर्लेकर, शिवसेना उपनेते, मा. नरहरीजी झिरवाळ, हंगामी विधानसभा अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ,मा. शिवसेना जिल्हाप्रमुख, श्री. विजयजी करंजकर, मा .श्री सुधाकरजी बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख ,नाशिक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२४ फेब्रुवारी २०२१ रोजी महाकवी कालिदास कला मंदिर, नाशिक येथे देण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
नाशिक दि १८ फेब्रुवारी – वै. ह. भ. प. तोताराम महाराज लेवा पाटीदार उत्कर्ष मित्र मंडळ, नाशिक चे अध्यक्ष, समाज सेवक श्री. लालजी पुरुषोत्तम पाटील यांनी आज पर्यंत अनेक समाज उपयोगी कामे केलेली असून अलीकडच्या लॉक डाउन काळात ज्या समाज बांधवांची नोकरी गेल्यामुळे, काम बंद झाल्यामुळे जे आर्थिक अडचणीत सापडले होते अशांना मंडळातर्फे, कार्यकारी सदस्यांची मदत घेऊन विविध प्रकारे मदतीचा हात दिला आहे. त्यांना आर्थिक तसेच मानसिक आधारही दिला आहे.
पुणे स्थित मुख्य कार्यालय असलेल्या लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर (LCCIA) व इतर समाजाभिमुख असलेल्या गेल्या वर्षभरातील वेबिनार चर्चांमध्ये श्री. लालजी पाटील यांनी सहभागी होऊन समाज उन्नती च्या विचारांची देवाण-घेवाण केलेली आहे.
नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन(N.S.D.C.) व क्रेडाई (Confederation of Real Estate Developers Association of India) यांच्या संयुक्त विद्यमाने, मार्च-२०१९ मध्ये महाराष्ट्रातील विक्रमी बांधकाम मजुरांचे नोंदणीकरण लेबर कमिशनर ऑफीस, नाशिक मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे श्री. लालजी पाटील यांचे तर्फे केलेले आहे व गेल्या दोन वर्षात या सर्व बांधकाम मजुरांना त्यांच्या खात्यावर शासनाकडून अत्यावश्यक अवजारे घेण्यासाठी तसेच कामगार मंडळाकडून विहित असलेली इतर मदत परस्पर बांधकाम मजुरांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत आहे.
नाशकातील नामांकित, प्रथितयश बिल्डर्स, CREDAI मेंबर्स, पॅसिफिक बिल्डरचे श्री. प्रशांत पाटील, जीआरएस इन्फ्राचे श्री. नरेंद्र राणे व उद्योजक श्री. ललित पाटील, श्री. सतीश नेमाडे यांनी श्री. लालजी पाटील यांना या कामी विविध स्वरूपात सहाय्य उपलब्ध करून सामाजिक भान जपले आहे. नाशिक मधील काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य स्वरूपात मदत घेऊन ती श्री. लालजी पाटील यांनी गरजू पर्यंत पोहोचवली आहे. काही सेवाभावी संस्थांकडून पोळी भाजी चे पॅकेट्स प्राप्त करून ते स्वतः बांधकाम मजुरांना राहात असलेल्या बांधकाम साइटवर पोहोच केले आहे. तसेच जे मजूर हायवेवर पायी चालत मुंबईहुन त्यांच्या घरी परतत असताना त्यांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. या सर्व मदतीचा परिणाम म्हणून बऱ्याचशा बांधकाम मजुरांना त्यांच्या आर्थिक अडचणीच्या काळात मदत मिळाल्याने त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटून त्यांनी त्यांच्या मुळगावी स्थलांतरित न होता ते कामाच्या ठिकाणीच राहू शकले.
श्री. लालजी पाटील यांच्या या समाजाभिमुख कृतीमुळे मजुरांना लॉकडाउन काळात जगणे सुसह्य तर झालेच पण त्याचबरोबर बांधकाम कामांचाही खोळंबा न होता बांधकामे नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकणार आहे. अशा प्रकारे बांधकाम मजूर आणि बांधकाम व्यवसायिक दोघांचाही त्यामुळे फायदाच झाला, दोघांचीही हित साधली गेली.
पुरस्कार कर्त्या श्री राजे छत्रपती संस्थेमार्फत सदरहू कामाची प्रत्यक्षात पाहणी व शहानिशा करून सदरहू मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
💐💐💐💐💐 श्री लालजी पाटील यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा ….. !💐💐💐💐💐
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी दोन लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचाही खर्च शासन करणार
– मुख्यमंत्री
मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन
जळगाव (जिमाका) दि.१५ : जिल्ह्यातील किनगाव, ता. यावल येथे पपई घेऊन जाणाऱा आयशर टेम्पो पलटी होऊन त्यात रावेर तालुक्यातील १५ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असून अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या भेटीप्रसंगी दिली.
आज (१५ फेब्रु) रोजी पहाटे किनगाव (ता.यावल) येथे आयशर टेम्पो पलटी होवून झालेल्या अपघातात रावेर शहरातील २, केऱ्हाळे व विवरे येथील प्रत्येकी १, तर अभोडे येथील ११ असा एकूण 15 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.
घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज दुपारी रावेर, अभोडे व विवरे येथील मृत कुटुंबियांच्या घरी जाऊन नातेवाईकांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे सांत्वन केले. तसेच स्मशानभूमीत उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी आ. शिरीष चौधरी, प्रल्हाद महाजन, योगीराज पाटील, पो.नि.रामदास वाकोडे, नायब तहसीलदार चंदू पवार, आनंद बाविस्कर, प्रदीप सपकाळे, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मृतांचे नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अपघातात मूत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव, गाव व वय पुढीलप्रमाणे – शेख हुसेन शेख मुस्लिम मन्यार, वय 30 वर्ष, फकीरवाडा, रावेर, सरफराज कासम तडवी, वय 32 वर्ष राहणार केऱ्हाळा, डिंगबर माधव सपकाळे, वय 55 वर्ष राहणार रावेर, संदीप युवराज भालेराव, वय 25 वर्ष राहणार विवरा, अशोक जगन वाघ, वय 40 वर्ष दुर्गाबाई संदीप भालेराव, वय 20 वर्ष, गणेश रमेश मोरे वय 05 वर्ष, शारदा रमेश मोरे वय 15 वर्ष, सागर अशोक वाघ, वय 03 वर्ष, संगीता अशोक वाघ, वय 35 वर्ष, सुमनबाई शालीक इंगळे, वय 45 वर्ष, कमलाबाई रमेश मोरे, वय 45 वर्ष, सबनुर हुसेन तडवी वय 53 वर्ष, नरेद्र वामन वाघ, वय 25 वर्ष, शेरू हुसेन तडवी, वय 20 वर्ष सर्व राहणार आभोडा, ता. रावेर असे आहेत.
तरुण तडफदार न्यूज । प्रशांत बोरकर
दुःखद बातमी – (रावेर । यावल )आज रात्री 12 वाजता पपई ची गाडी कीनगाव जवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात पलटी होऊन भीषण अपघात झाला.यात आभोडा येथील 12 , केरहाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर ठार झाले असून 5 गंभीर जखमी झाले आहेत.सर्व 16 मृतदेह ग्रामीण रुग्णालय यावल येथे आहेत.
रावेर पो स्टे हद्दीतील आभोडा गावातील एकाच कुटुंबातील 12 इसम अपघातात मरण पावले असून केरहाळे 2 रावेर-2असे एकूण 16 इसम ट्रक अपघातात मरण पावले आहे खूपच दुःखद घटना असून नमूद अपघात यावल पो स्टे हद्दीत घडला आहे.
तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर
रावेर तालुक्यात नाफेड मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत हमी भावाने ( चना/ हरभरा ) खरेदीसाठी नाव नोंदणी सुरुवात.
२०२०/२०२१ वर्षाच्या हंगामात केंद्र शासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत (चना/ हरभरा) खरेदी केंद्र रावेर ,उपअभिकर्ता संस्था म्हणून तालुक्यातील रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मार्फत (चना/) खरेदीसाठी नावनोंदणी दिनांक 17 फेब्रुवारी 2021 बुधवार पासून सुरू होणार आहे . शासकीय हमीभाव खालील प्रमाणे
चना/हरभरा- 5100₹,
प्रतिक्विंटलप्रमाणे आहे .
शेतकऱ्यांनी नाव नोंदणी साठी आधार कार्ड झेरॉक्स, बॅक पासबुक झेरॉक्स, पिकाचा ऑनलाईन चालु खरीप हंगामाचा (चना/हरभरा) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला घेऊन संस्थेशी संपर्क करावा.
शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे , त्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी ; अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते .
:– ( व्हा.चेअरमन किशोर माणिकराव पाटील रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि रावेर)
WOW! 🤩 This video is going viral, tap to view it! https://api.mitron.tv/v1/share?id=Zy8An2YPBubvwoHYA Check out more entertaining videos on Mitron! 👇👇👇👇👇 http://bit.ly/MitronTv https://api.mitron.tv/v1/share?id=Zy8An2YPBubvwoHYA
WOW! 🤩 This video is going viral, tap to view it! https://api.mitron.tv/v1/share?id=dLna40VN0cxpzBH8d
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
श्री दिव्यांग संघटना जिल्हा जळगाव यांच्या वतीने दिनांक 18/2/2021 रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलन
रावेर तालुक्यात दिव्यांग बांधवांसाठी शासनाने पारित केलेले आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी रावेर तहसीलदार मॅडम, रावेर गटविकास मॅडम तसेच रावेर पोलीस निरीक्षक साहेब, यांना निवेदन देण्यात आले यासंदर्भात आम्ही राज्यात जिल्ह्यात व तालुक्यात शासनाकडे वारंवार निवेदन उपोषण आंदोलन करून सर्व शासन मान्य निर्णयाचा अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली परंतु गेंड्याच्या कातडीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुमची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे या मुजोर भ्रष्ट प्रशासनावर कारवाई व्हावी व शासन निर्णयानुसार रावेर व यावल तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 18 /2/ 2021 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक बऱ्हाणपूर रोड रावेर येथे सकाळी 11 वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी निवेदन देताना डॉक्टर विवेक सोनवणे प्रहार संघटना, श्री दिव्यांग संघटना जळगाव जिल्हा जिल्हाध्यक्ष संजय दिनकर बुवा उपाध्यक्ष घनश्याम हरणकर, जिल्हा सचिव रजनीकांत शामराव बारी, कार्याध्यक्ष विशाल रत्नाकर कासार, सदस्य दिलीप जैन, संजय माळी, महेश महाजन, प्रदीप परदेसी, रमेश चौधरी, कामिल शेख, शेख फरीद,सह रावेर यावल तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते
तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर
जि.प.प्राथमिक शाळा निंबोल ता-रावेर येथील आदर्श,उपक्रमशील,सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करून,विद्यार्थी हित जोपासणार-या,समाजकारण, महिला सक्षमीकरण,सहकार क्षेत्रातील योगदान,या सर्व बाबी सांभाळून विद्यार्थी हितासाठी सदैव कटिबध्द् राहून,प्राधान्य देणार-या शिक्षण क्षेत्रात एक वेगळी प्रतिमा निर्माण करून,इतरांसमोर आदर्श ठेवणा-या,अतिशय नम्र,
विनयशील,अशा आदर्श शिक्षिका,व ग.स.सोसायटी, जळगाव च्या मा.संचालिका,
सौ.कल्पना दिलीप पाटील यांना कर्जोद ता-रावेर येथे सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिनानिमित्त “फातेमाबी शेख आदर्श सन्मान” पुरस्काराने रावेर चे मा.आमदार दादासाहेब शिरीष चौधरी,तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ताईसाहेब मा.ना.रंजनाताई पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
प्रेस नोट
ओबीसींसाठी लढा द्या – विजय वडेट्टीवारराष्ट्रीय
ओबीसी महासंघाच्या विदर्भस्तरीय महाअधीवेशनातसंघर्षाचा निर्धार…
खामगाव/
रविवार दि. ७ फेब्रुवारी२०२१.
ओबीसी समाजसंघटित नसल्याने अजूनही प्रश्न सुटले नाहीत. जातनिहाय जनगणना न झाल्याने हक्काचेआरक्षणदेखील मिळत नाही. ओबीसींमधील भटक्या जमातींना आजही घरे नाहीत . त्यांनापालावर आयुष्य काढावे लागते . वर्षानुवर्षांपासून होणारा हा अन्याय दूर करण्यासाठीजातीसाठी लढण्यापेक्षा ओबीसींसाठी लढा उभारा , असे आवाहन ओबीसी कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.राष्ट्रीयओबीसी महासंघाचे विदर्भस्तरीय महाअधिवेशन रविवारी खामगावातील कोल्हटकर स्मारकसभागृहात झाले . उद्घाटक म्हणून वडेट्टीवार बोलत होते . अध्यक्षस्थानी राष्ट्रीयओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ . बबनराव तायवाडे , प्रमुख अतिथी ओबीसी समितीचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, स्वागताध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष इंजिनीअर रमेशचंद्रघोलप तर आमदार राजेश एकडे , आकाश पुंडकर , माजी आमदार राहुल बोंद्रे , दिलीप सानंदा , सचिन राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बबनराव तायवाडेम्हणाले , राष्ट्रीय ओबीसीमहासंघ ही काम करणारी संघटना आहे . या संघटनेच्या माध्यमातून ओबीसींना एकसूत्रातबांधण्याचे काम केले जात आहे . दबाव तयार झाल्यानेच मागील काही वर्षांत सरकारलावेगवेगळ्या घोषणा कराव्या लागल्या . यापुढेही जनगणनेचा मुद्दा लावून धरावा लागणारअसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . २०१६ मध्ये नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर धडकमोर्चा काढण्यात आला होता. ओबीसींच्या मागण्या समजूनघेण्यासाठी राज्य सरकारने भाऊसाहेब फुडकर आणि महादेव जानकर यांना पाठविले होते ,अशी आठवणही तायवाडे यांनी खामगावच्या अनुषंगाने काढली.आमदार आकाश फुडकर यांनीही त्याला दुजोरा दिला. “ बाबा ओबीसींच्या प्रश्नांवर तळमळीने काम करायचे “ असे त्यांनी सांगितले. माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपण ओबीसी असल्याचे जाहीररीत्या सांगितले . यानंतरव्यासपीठावरील प्रत्येक नेत्याने आपण ओबीसी असून समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंतझटणार असल्याचाही शब्द दिला.पक्षभेदविसरून एकत्र येऊ : आमदार. कुटेबहुजन कल्याण मंत्री विजयवडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा म्हणून काही लोकांकडून मागणी केली जात आहे . पण ,त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही . ओबीसी म्हणून समाजासाठीतुम्ही कार्य करीत आहेत . याच विभागाचे मंत्री असल्याने समाजातील घटकांना न्यायमिळवून देणे हे कामच आहे . यापूर्वी मीसुद्धा या विभागाची धुरा सांभाळली . पक्षवेगळे असले समाजासाठी एकत्र येऊन ओबीसींसाठी काम करू , ‘ अशीग्वाही भाजपचे आमदार डॉ . संजय कुटे यांनी दिली .
रमेशघोलप यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चळवळ ओबीसींनी ओबीसींसाठीचालविलेली आहे. जनगणना सरकार करीत नसेल तर ओबीसी समाज निधी गोळा करून हे काम करणार असल्याचेहीस्पष्ट केले. मंडल स्तंभाचे जनक माजी आमदार नारायणराव मुंढे यांचा महाअधिवेशनादरम्यानसत्कार करण्यात आला. महाअधिवेशनाला बुलडाणा, अकोला,जळगाव, अमरावतीसह संपूर्ण विदर्भातून ओबीसीबांधव आले होते. या महाअधिवेशनाची संपूर्ण धुरा बुलडाणा जिल्ह्याचे राष्ट्रीयओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अनिल अमलकार आणि ओबीसींमधील जात संघटनेच्यापदाधिकाऱ्यांनी सांभाळली यामध्ये अॅड. प्रमोद डांबरे, विनोद चिंचोले, अरविंदशिगांडे, प्रल्हादभाऊ बगाडे, रामकृष्णजवकार, सौ. माधुरीताई राणे, अनिलमुलांडे, सौ. रत्नाताई डिक्कर, सौ.मीनाताई सातव, नरेन्द्र कुटे, ओ.पी.तायडे,सिध्देश्वर पवार, राजेश अंबुस्कार, अँड. सचिन मेहेत्रे, प्रा. गणेश बोचरे, आकाश वानखडे, रामेश्वर कापडे, दिगांबरसरदार, धनजंय महाले, रामतिलक कुकडे,अनिकेत जौहरी, सुरेश बेलोकार, नितीन बोंबटकर, विजय नारखेडे, नसिमशहा, चक्रधर बेलोकार, राजुभाऊ अंबुस्कर,भास्कर भोंडे, राहुल यादगीरे, सचिन हांडगे, अॅड. बगाडे साहेब, मनोज भोपळे, अभिषेक थोरात, संकेतरहाटे, दिलीप घुले, रामविलास कुकडे,अँड. पी.एम.वानखडे, अॅड. जयंत तायडे, शिवशंकर ढोले, विलास निंबोळकर, योगेश डांगे, विवेक पाऊलझगडे, रविन्द्रखंडारे, संतोष बुरकले, रमेश ठाकरे,राजेन्द्र वाघ, अनंत भारंबे, प्रशांत खेटे, अँड. शुभम फेरंग, सौ. सुनिताताई राजोते, सौ. चंदाताई पुंडे, सौ. लताताई तायडे, सौ. किरणताई लंगोटे, सौ. जयश्रीताई वांढे, सौ. मनिषाताई बगाडे, सौ. आशाताई ताडे, सौ. सुषमा खडसन, सौ. अनिता चौधरी, सौ. मिनाक्षीताई इंगळे, सौ.सुवर्णाताई वडोदे, श्रीमती. सुशिलाताई वावगे,दिपक घुले, राज सुसरे, दुर्गेशपाटील, ऊखर्डा पाटील, नंदु शिंदे,गणेश पाटील, अर्जुन तायडे, अजय भातुरकर, शिवहरी गायगोळ, श्याममारखडे, शिवाजीराव दांदळे, अमोल मु -हे, मयुर बोचरे, तुषार ठाकरे, पांडुरंगे पिंपळे, प्रविण बोमरे, विठ्ठल दांदळे, शुभम डिक्कर, किरणदांदळे, तुषार महाले, दिपक फेरंग,विजय मोरखडे, शुभम गायगोळ व इतर ओबीसी बांधवहोते.
कुठल्या प्रश्नांवर चर्चा ?
१) ओबीसींची स्वतंत्रजनगणना व्हावी. २) लोकसंख्येच्याप्रमाणात आर्थिक तरतूद हवी. ३) आरक्षणाचा वाटामिळावा म्हणून जागर करणार. ४) मागण्यांवर चर्चाकरून सरकारपुढे मांडल्या जातील. ५) सरकार यावरसकारात्मक निर्णय घेईल…
कृपया प्रकाशनार्थ
आपला नम्र
रोशन कुंभलकर
(प्रसिद्धी प्रमुख)
राष्ट्रीय ओबीसी महासंघ
Mob: 8421008900
प्रति ,
माननीय संपादक,
दैनिक …..
दिंनाक: 08/2/2021.
उपरोक्त बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करूनआम्हास उपकृत करावे ही विनंती.
धन्यवाद…
तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर
कोरोना लस घेतांना कुसुंबा खुर्द।। ता.रावेर येथील पोलीस पाटील श्री रईस जाफर तडवी
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
आज कुसुंबा खुर्द।। ता.रावेर येथे पल्स पोलीओ कार्यक्रम ला पोलीओ डोस पाजतांना पोलीस पाटील श्री रईस तडवी, व आरोग्य कर्मचारी ANM सरला बारेला MPW, व मदतनीस रजिया तडवी
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मागणीला यश
जळगाव जिल्ह्यासाठी मिळाला 100 कोटी रुपयांचा वाढीव निधी
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 400 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा मंजूर
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पायाभूत सुविधांना प्राधान्य द्यावे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार
जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसधारण) 2021- 2022 करीता 300 कोटी 72 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर होता. या नियतव्ययात आणखी 100 कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवून दिला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता 400 कोटी रुपये मिळणार आहे, अशी माहिती जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा वार्षिक योजनेची राज्यस्तरीय आढावा बैठक नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीस जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रजंना पाटील, वित्त व नियोजन विभागचे अपर सचिव श्री. देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, उपसचिव विजेसिंग वसावे, विशेष कार्य अधिकारी एस.एल.पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांच्यासह विविध यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यास जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसधारण) सन 2021 -2022 करीता 300.72 कोटी रुपयांचा नियतव्यय मर्यादा ठरवून दिलेली होती. मात्र, कार्यान्वयीन यंत्रणांनी 528.44 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. त्यानुसार किमान 100 कोटी रुपयांची जादाची मागणी असून या निधीतून आरोग्य केंद्रांची बांधकामे, पाटबंधारे विभागाच्या योजना, रस्ते विकास, नगररचनाची कामे, वने, क्रीडा,अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी वाढीव मागणी मंजूर करण्याचे विनंती यावेळी पालकमंत्र्यांनी बैठकीत केली.
नागरी भागात सुविधांची निर्मिती करा
जळगाव जिल्ह्यातील सुविधांसाठी 100 कोटी रुपये जादा निधीच्या मागणीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी मान्यता दिली. यावेळी श्री. पवार म्हणाले, की जिल्हा वार्षिक योजनेतून खर्च न होणारा निधी नगरपालिका व नगरपरिषदांना उपलब्ध करुन द्यावा. या निधीतून नागरी भागात सुविधांचे जाळे निर्माण करावे .
पालकमंत्र्यांच्या मागणीस यश
या बैठकीत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, नगरविकास, रस्ते विकास, वने, क्रीडा इत्यादी योजनांसाठी प्राथम्याने अतिरिक्त 100 कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर केले होते.
कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा जळगाव जिल्ह्यात झाला होता. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला आरोग्य सेवा सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पालकमंत्री श्री. पाटील यांनी केली होती. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून चालू वर्षात 500 शाळांना संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. पुढील वर्षी उर्वरीत शाळांना तसेच जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. पोलिस विभागास चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात येत, असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत सांगितले.
संगणक प्रणालीचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक
जिल्हा वार्षिक योजनेचा संपूर्ण निधी I PASS या संगणकीय प्रणालीवर वितरीत करण्यात येत असल्याचे पालकमंत्री यांनी बैठकीत सांगितले. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे व नियोजन विभागाचेही कौतुक केले.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सादरीकरण करताना सांगितले, की कोरोना विषाणूच्या काळात जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये 300 पेक्षा अधिक आयसीयू बेड व 1200 ऑक्सिजन युक्त बेड तयार करण्यात आले आहेत. ऑक्सिजन टँकचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, असे सांगितले.
चॅलेंज निधीतून 50 कोटी रुपये
जिल्हा वार्षिक योजनेची नाशिक विभागात प्रभावी आणि सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्याला 50 कोटी रुपयांचा चॅलेंज निधी मिळणार आहे. या निधीसाठी विभागातून एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी I PASS यंत्रणेचा संपूर्ण वापर, जिल्हा नियोजन समितीच्या नियमित बैठका, जिल्हा वार्षिक योजनेचा पूर्ण निधीचा विनियोग करणे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नावीण्यपूर्ण निधीचा विनियोग करणे, कार्यकारी आणि उपसमितीचे गठण करणे आवश्यक राहील.
35 लाख रुपयांचा विशेष निधी
जिल्हा वार्षिक योजनेत राष्ट्रीय जल योजनेचा समावेश नाही. यामुळे विशेष बाब म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सर्वेक्षणासाठी 35 लाख रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात यावा. शेत पाणंद रस्ते MREGS अभिसरणाच्या माध्यमातून चांगली कामे करावीत, तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, अंगणवाड्या इमारतींना संरक्षक भिंत बांधण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.
विकास कामांना गती द्या
जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीतून जळगाव जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी. दळण- वळणाच्या सुविधा, शिक्षण, आरोग्य, क्रीडा सारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
🔸तरुण तडफदार न्यूज दि.11 फेब्रु I प्रशांत बोरकर, शशांक बोरकर🔸
प्रेसनोट
सर्वाना कळविण्यात येते की, दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी महाराजस्व अभियानांतर्गत
संगणकीकृत सातबारामधील चुका दुरुस्तीचे कामकाज करण्याकामी कॅम्प/ शिबीर सकाळी 10.00
वा.प्रशासकीय ईमारत तहसिल कार्यालय रावेर येथे आयोजीत केलेला आहे.
त्या निमित्ताने रावेर तालुक्यातील 7/12 दुरुस्तीसाठी नवीन अर्ज स्विकारणे, जुन्या हस्तलिखित
अभीलेखावरुन खात्री करणे, तलाठी यांनी कलम 155 चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसीलदार यांनी
ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करुन मान्यता देणे, परिशिष्ट क मधील आदेश तहसीलदार यांनी स्वाक्षरी करणे
आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांचे स्वाक्षरीत आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे इत्यादी
कामे करण्याकरिता तालुकास्तरावर कॅम्प/ शिबीर आयोजीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
तरी तालुक्यातील ज्या खातेदार यांच्या संगणकीकृत सातबारामधील उक्त नमूद केलेल्या त्रुटी/ चुका
असतील त्यांनी दुरुस्तीकामी सदर कॅम्प/ शिबीरामध्ये दिनांक 13/02/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता
तहसिल कार्यालयात रावेर उपस्थित राहावे हि विनंती.
असे तहसिलदार रावेर यांनी कळविले आहे .
🔸तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🔸
ग्रामीण महिला व बालकांना मिळतो पारस बागेचा आधार,
*नारीशक्ति महिला प्रभाग संघ,* विवरा-वाघोदा गटांमधील *जय श्रीकृष्णा महिला ग्राम संघ* *शिंदखेडा* यांच्यामार्फत माननीय गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
आज परसबागेतील सेंद्रिय खतांमधून तयार केलेला सेंद्रिय भाजीपाला गावातील स्तनदा माता गरोदर माता व कुपोषित बालकांना वाटप करण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाला श्री अंकुश जोशी सर तालुका अभियान व्यवस्थापक श्री महेंद्र वाघ सर प्रभाग समन्वय उपस्थित होते तसेच ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील, CRP सौ.रुचिता महाजन बँक सखी जयश्री पाटील आशा वर्कर सौ.ज्योती पाटील गावाचे पोलीस पाटील नवनिर्वाचित सदस्य व जिल्हा परिषद परिषद शाळेतील शिक्षिका सौ.जयश्री धांडे तसेच ग्राम संघातील सर्व महिला उपस्थित होत्या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
▪️तरुण तडफदार न्यूज▪️
पत्रकार संतोष ढिवरे यांचे अल्पशा आजाराने निधन;उद्या सकाळी 9:15 होणार अंतसंस्कार*
जळगाव, (प्रतिनिधी)- पत्रकार संतोष ढिवरे यांचे आज दि.08 रोजी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे उपचार घेत असताना दुःख निधन झाले आहे.
त्यांच्या पच्छात आई, भाऊ पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
उद्या मंगळवार दिनांक 9 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरून अंतयात्रा निघणार असून मेहरूण येथील स्मशान भूमी येथे सकाळी 9:15 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
निर्भीड पत्रकार संतोष ढिवरे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात ‘स्वतंत्र ठसा ‘ उमटविणारे व्यक्तिमत्त्व गमावले
▪️मुंबई । तरुण तडफदार न्यूज ▪️
पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व
निर्भीड पत्रकार संतोष ढिवरे यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात ‘स्वतंत्र ठसा ‘ उमटविणारे व्यक्तिमत्त्व गमावले. त्याच बरोबर एक चांगला मित्र आज काळाच्या पडद्याआळ गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. कालकथित संतोष ढिवरे यांच्या आत्म्यास शांती लाभो… हीच प्रार्थना…
शोकाकुल – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
▪️तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर▪️
आदरणीय रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांची महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शिवसेना रावेर तालुकाध्यक्ष योगीराज पाटील, काँग्रेस कमिटी रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, कू.उ.बा.स. रावेर माजी सभापती पितांबर पाटील, रा.यु.कॉ. जळगांव जिल्हाउपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
रावेर यावल तालुकाचे लोकप्रिय आमदार मा श्री शिरीषदादा चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश आय काँग्रेस कमिटी उपध्याक्ष पदी नियुक्ती झाली त्यांचे स्वागत करतांना जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी माजी अध्यक्ष राजीवदादा पाटील रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर हरीभाऊ महाजन रावेर संतोष लालचंद पाटील रावेर
यावेळी सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
🛑तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🛑
🙏🌼🙏
आज रोजी रावेर येथे माळी समाजाचे आराध्य दैवत श्री संत सावता माळी 🚩यांचे सोळावे वंशज 🙏ह.भ.प श्री रमेश महाराज यांचे आगमन झाले.
समस्त माळी समाज पंच मंडळ रावेर तर्फे त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यांनी संत सावता महाराजांवर मनोगत व्यक्त केले,तसेच सावता महाराज यांचे भव्य मंदिर त्यांच्या जन्मगावी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सोबत ग्राम वाघोदा येथील राष्ट्रीय गौरव पुरस्कारित पत्रकार श्री.कमलाकर माळी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
✨💫✨💫
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी समाज सचिव श्री विनोद पाटील यांनी केले व आभार श्री प्रल्हाद महाजन यांनी केले.
याक्षणी :- नामदेव महाजन,ईश्वर महाजन,प्रल्हाद पाटील,रमेश महाजन,रामदास महाजन,पंडित महाजन,समाधान महाजन,लखन महाजन,प्रकाश महाजन,सुकलाल महाजन,हिरामणमहाजन,सुनील महाजन,पत्रकार.कमलाकर माळी,देविदास महाजन…
आदी उपस्थित होते.
जय ज्योति जय क्रांति🙏🚩🌼🙏
🛑तरुण तडफदार न्यूज I प्रशांत बोरकर🛑
*प्रेस विज्ञप्ति*
*परम संत कृपाल सिंह जी महाराज शांती आणि मानव एकता के प्रकाश-स्तंभ : संत राजिंदर सिंह जी महाराज*
सावन कृपाल रूहानी मिशन चे प्रमुख संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी परम संत कृपाल सिंह जी महाराज
(6 फेब्रुवारी,1894 – 21 ऑगस्ट, 1974) यांच्या 127 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने आपला पावन संदेश समस्त मानव जातीला दिला. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या शिकवणुकीला पुन्हा एकदा ताजे केले.
विशेष ऑनलाइन कार्यक्रमात संत राजिंदर सिंह जी महाराज आपला पावन संदेश देतांना म्हणाले, परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी विश्वभरात हजारो-लाखो आत्म्यांना अध्यात्म आणि प्रेमाचा संदेश दिला आणि पिता परमेश्वराशी एकरूप होण्याकरिता मार्गदर्शन केले.
शिकागो, अमेरिकेतून युट्युब वर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशातून संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी उद्बोधन केले की, “परम संत कृपाल सिंह जी महाराज विश्वशांती आणि मानव एकता यासाठी समर्पित होते. त्यांनी विभिन्न जाती, भाषा आणि धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण केले आणि संदेश दिला की आपण सर्वजण एकाच पिता परमेश्वराच्या परिवाराचा भाग आहोत.”
या ऑनलाईन कार्यक्रमाच्या प्रारंभी पूजनीय माता रीटा जी यांनी गुरू अर्जन देव जी महाराज यांची दिव्य वाणी, “ठाकूर जिओ तुहारो परना” या भक्तीगीता ने केली.
परम संत कृपाल सिंह जी महाराज यांना ‘मानव एकतेचे पितामह’ असे सुद्धा म्हटले जाते, त्यांची आठवण करताना संत राजिंदर सिंह जी महाराज म्हणाले की, “त्यांची इच्छा होती की आपण सर्वांनी शांती, खुशी तसेच एक दुसऱ्यांवर प्रेम करुन जगावं. लहानपणापासूनच त्यांचे लक्ष पिता परमेश्वराचे ध्यान करण्याकडे होते. त्यांची इच्छा होती की आपण आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजावून घ्यावा, जो आत्मा आणि परमात्मा यांच्या एकरुपते चा आहे आणि त्यांनी याचा निज अनुभव सुद्धा करुन दिला.”
ते पुढे म्हणाले की, “ते मागील शताब्दीचे शांती आणि मानव एकतेचे प्रकाश स्तंभ होते. परम संत कृपाल सिंह जी महाराज विश्वधर्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते. ही संघटना मानव ऐक्यासाठी कार्यरत आहे. याकरिता त्यांच्या सानिध्यात 1974 मध्ये मानव एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांची इच्छा होती की आपण सर्वांनी सचोटीने आणि एकतेने जीवन जगावे. आपण त्यांनी दिलेली शिकवणूक आपल्या जीवनात उतरवू या आणि आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश स्वतःला ओळखणे व प्रभु परमात्म्याला प्राप्त करणे याच जीवनात पूर्ण करूया”.
परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी आपल्या जीवनात मानव एकते करिता अथक प्रयत्न केले. त्यांनी संपूर्ण विश्वाला ध्यान-अभ्यासातून अध्यात्मिक शांतीचा संदेश दिला. आज विश्वभरात लाखो लोक त्यांना मानव एकतेचे जनक आणि या शतकातील महान संतांच्या रूपात त्यांचे स्मरण करतात. त्यांचा अध्यात्मिक कार्यकाल सन 1948 ते 1974 पर्यंतचा होता, या कालावधीत त्यांनी आपले अध्यात्मिक प्रेम, शांती आणि आशेचा संदेश संपूर्ण विश्वभरात दिला.
विभिन्न धर्मातील संत-महात्म्यांना एकाच मंचावर बसविण्याचे श्रेय परम संत कृपाल सिंह जी महाराज यांना जाते. यांच्या अध्यक्षतेखाली 4 विश्वधर्म संमेलने जी 1957, 1960, 1965 आणि 1970 मध्ये आयोजित केली गेली. या संमेलनामध्ये विविध धर्मातील अनेक संत-महात्म्यांनी आपसात विचारविमर्श करून असा अनुभव केला की, भले आपण वेगवेगळ्या धर्माशी निगडीत असू, परंतु आपण एकाच परमपिता परमेश्वराची संतान आहोत या नात्याने आपण सर्व वास्तवतः एक आहोत. त्यांच्या या महान योगदानाला सदैव स्मरणात ठेवले जाईल. फेब्रुवारी, 1974 मध्ये त्यांच्या सानिध्यात मानव एकता संमेलन आयोजित करण्यात आले होते. परम संत कृपाल सिंह जी महाराज असे पहिले महापुरुष होते ज्यांनी 1 ऑगस्ट, 1974 रोजी भारतीय संसदेला संबोधन केले.
परम संत कृपाल सिंह जी महाराज यांच्या या अध्यात्मिक कार्याला दयाळ पुरुष संत दर्शन सिंह जी महाराज (14 सप्टेंबर,1921 ते 30 मे,1989) यांनी पुढे चालविले. विद्यमान संत राजिंदर सिंह जी महाराज हे परम संत कृपाल सिंह जी महाराज यांनी सुरू केलेल्या अध्यात्मिक कार्याचा प्रसार तेज गतीने करीत आहेत.
मिशनचे अध्यक्ष संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी विश्वभरात प्रवास करून लोकांना ध्यान-अभ्यासाचे तंत्र शिकवत आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मनुष्य जीवनाचे ध्येय ‘स्वतःला ओळखणे व परमपिता परमेश्वराची प्राप्ती करणे’ याला याच जीवनात पूर्ण करू शकतो.
ध्यान-अभ्यासाकरिता विश्वविख्यात अध्यात्मिक गुरु संत राजिंदर सिंह जी महाराज आज संपूर्ण विश्वात ध्यान-अभ्यासाद्वारे परस्परातील प्रेम, एकता व शांतीचा संदेश प्रसारित करीत आहेत. विभिन्न देशांनी त्यांच्या या कार्याच्या गौरवार्थ अनेक शांती पुरस्कारांनी तसेच पाच डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांना सन्मानित केलेले आहे. अध्यात्म आणि ध्यान-अभ्यास या विषयावर त्यांनी लिहलेली पुस्तके विश्वभरात मोठ्या प्रमाणावर विक्री झालेल्या पुस्तकांमध्ये गणली जातात.
सावन कृपाल रुहानी मिशन ची आज संपूर्ण विश्वामध्ये तीन हजारपेक्षा अधिक केंद्रे स्थापन झालेली आहेत. तसेच या मिशनचे साहित्य विश्वातील 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. मिशन चे मुख्यालय विजयनगर, दिल्लीमध्ये आहे. तसेच अंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले अमेरिकेत आहे.
सावन कृपाल रुहानी मिशन
मीडिया प्रभारी
सौरव नरूला
🔸तरुण तडफदार न्यूज I शशांक बोरकर🔸
खान्देश कन्या समृद्धी संत हिचे जळगावात अविस्मरणीय स्वागत
26 जानेवारी 2021 रोजी नवी दिल्ली येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या रिपब्लीक डे परेड मध्ये भारतीय नॅशनल कॅडेट कॉर्पस् (एन.सी.सी.) गर्ल्स कन्टीजन्ट (मुलींच्या चमूचे) नेतृत्व करण्याचा मान जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील द्वितीय वर्ष बी.कॉम. ची विद्यार्थीनी सिनियर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत हीला प्राप्त झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्रातील मुलीची निवड यासाठी करण्यात आली होती. देशभरातून 125 एन.सी.सी. कॅडेटस सदर परेडसाठी निवडण्यात आले होते. यामधून समृद्धी संत हिची प्लाटून कमांडर म्हणून निवड करण्यात आली. नवी दिल्ली येथे दिड महिना सराव सुरू होता.
समृद्धीचे आगमन शनिवार दि. 6 फेब्रुवारी रोजी जळगाव रेल्वे स्टेशन येथे झाले. प्रजासत्ताक दिवसाची परेड भारतात संविधान अमलात आणल्यागेल्या निमित्ताने होत असते. सदर भारतीय संविधान बनविणाऱ्या समितीचे प्रमुख महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. समृद्धीची जळगावात आल्यावर प्रथम बाबासाहेबांना वंदन करण्याची इच्छा होती यानुसार स्टेशनहून बाहेर आल्यावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हायड्रॉलिक क्रेन च्या सहाय्याने माल्यार्पण करण्यात आले. यावेळी समृद्धीचे वडील ऍ़ङ हर्षल संत व युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया तिच्यासोबत मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते.
यानंतर सजविलेल्या खुल्या जीपमध्ये समृद्धीच्या रॅलिची सुरूवात करण्यात आली. जीपमध्ये हातात भारतीय तिरंगा गर्वाने फडकवत असलेली खान्देश कन्या सिनीअर अंडर ऑफिसर समृद्धी संत सोबत तीचे वडील ऍ़ड. हर्षल संत, आई अर्चना संत, आजोबा चंद्रकांत संत, आजी प्रेरणा संत व लहान भाऊ सार्थक संत उपस्थित होते.
ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीते, भारतामाता की जय अश्या विविध देशभक्तीपर घोषणा व जळगावकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या साक्षीने नेहरू चौक-शिवाजी पुतळा-स्वातंत्र चौक-आकाशवाणी चौक-काव्यरत्नावली चौक-आस्वाद चौक-मूळजी जेठा महाविद्यालय या मार्गाने दोन खुल्या सजविलेल्या जीप, 300 ते 400 मोटरसायकल्स, भारतीय ध्वज, फुलांची पुष्पवृष्टी, अश्या भव्य इतमामात रॅली पुढे सरकली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर महापौर सौ. भारती सोनवणे व शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांनी समृद्धीचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना समृद्धीने माल्यार्पण केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, भरत करडीले, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, सुनिल याज्ञीक, पियुष हसवाल, संदिप सुर्यवंशी, आशा फाऊंडेशनचे गिरीष कुळकर्णी, पियुष रावल इ. मान्यवर उपस्थित होते.
चौकाचौकात समृद्धीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणाऱ्यांची रांग लागली होती. नेहरू चौक येथे नेहरू चौक मित्र मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी रिकेश गांधी, पियुष गांधी उपस्थित होते. आचार्य कॉम्प्लेक्स जवळ डॉ. संजीव हुजूरबाजार व डॉ. आरती हुजूरबाजार यांनी स्वागत केले. स्वातंत्र चौक येथे ब्राह्मण सभा जळगाव तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी किरण कुळकर्णी, संदिप कुळकर्णी, अमोल जोशी, संजय जोशी हे उपस्थित होते.
आकाशवाणी चौक येथे बहुभाषीक ब्राह्मण संघातर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीकांत खटोड, राजेश नाईक, अशोक वाघ, सुधा खटोड, लेखराज उपाध्याय, सुरेंद्र मिश्रा, अजित नांदेडकर, अमला पाठक उपस्थित होते.
काव्यरत्नावली चौक येथे पिंकेथॉन ग्रुप तर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रेमलता सिंग, सरिता खाचणे, प्रकाश सिंग उपस्थित होते. यासह क्रियेटिव्ह ग्रुप तर्फे स्वागत करण्यात आले. ग्रुपचे मधुकर पाटील, सुनिल याज्ञीक, मिलींद पुराणिक इ. उपस्थित होते. यानंतर मू. जे. महाविद्यालय येथे युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे भव्य पुष्पवृष्टी व आतिषबाजी करून रॅलिची सांगता करण्यात आली.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, बहुभाषीक ब्राह्मण संघाचे राजेश नाईक, सुनिल याज्ञीक, गिरीष कुळकर्णी, पियुष हसवाल, प्रितम शिंदे, संदिप याज्ञीक, शाम कासार, गोपाल पंडीत, संदिप सुर्यवंशी, अमित जगताप, किरण कुळकर्णी, जितेंद्र याज्ञीक, हितेष सुर्यवंशी, अर्जून भारूळे, प्रशांत वाणी, मनोहर चव्हाण, अमोल गोपाल, राहूल चव्हाण, सौरभ कुळकर्णी, एन.सी.सी. चे कॅडेटस यांनी परिश्रम घेतले.
🔸तरुण तडफदार न्यूज 🔸
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत बौद्धिक मालमत्ता समर्थन आणि गुणवत्ता परीक्षण योजना या दोन्ही योजना राबविण्यात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज त्यांचा शुभारंभ करण्यात आला.
राज्यातील होतकरू तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत ₹१० लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तसेच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही ₹२ लाखांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
महाराष्ट्रात शहरी आणि ग्रामीण भागात प्रचंड बुद्धिमत्ता असलेले युवक असून या हिऱ्यांना पैलू पडण्याचे काम कौशल्य विकास विभागाने हाती घ्यावे. ज्यांना नवीन काही करण्याची इच्छा आहे अशा तरुणांना साधन, संपत्ती आणि मार्गदर्शन देऊन जगासमोर आणावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.